उस्मानाबाद -: महाराष्ट्र  शासनाने मागासर्गीय विद्यार्थ्यांसाठी ई-स्‍कॉलरशीप ही योजना कार्यान्वित केलेली आहे. या योजनेमुळे शिष्यवृत्तीची रक्कम थेट मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या खात्यात तर शिक्षण फी परिक्षा फी व इतर अनुषंगिक फी संबंधित महाविद्यालयाच्या खात्यात जमा होणार आहे. जे मागासंवर्गीय विद्यार्थी ऑन लाईन अर्ज भरतील त्यांनाच मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचा आणि संबंधित महाविद्यालयांना शिक्षण फी व परिक्षा फीचा लाभ देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://mahaeschol.maharashtra.gov.in/ escholarship/login.aspex  या वेबसाईटवर यापूर्वी  दिनांक 15 नोव्हेबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली होती.  आता त्यात वाढ करुन  अर्ज भरण्याची मुदत दि. 15 डिसेंबर 2012 पर्यत वाढविण्यात आलेली आहे.
          वाढीव मुदतीत अर्ज भरणाऱ्या विद्यार्थींना शिष्यवृत्ती/ शिक्षण फी, परीक्षा फी डिसेंबर,  2012 नंतर मिळेल, याची विद्यार्थ्यांनी तसेच प्राचार्यांनी नोंद घ्यावी. याबाबत कोणतेही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्यावर राहील. अर्ज भरण्याबाबत काही अडचणी आल्यास त्यांनी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा.                                        

 
Top