उस्मानाबाद :- उस्मानाबा जिल्हयातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयांच्या प्राचार्यानी त्यांच्या महाविद्यालयात सन 2012-13 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या व व्यावसायीक अभ्यासक्रमात प्रथम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव दि. 30 नोव्हेंबर पुर्वी सहायक आयुक्‍त, समाज कल्याण, उस्मानाबाद या कार्यालयात त्वरीत सादर करावेत असे आवाहन करण्यात येत आहे.
       दि.  30 नोव्हेंबर नंतर आलेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी नोंद घ्यावी  व तसे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे,असे कळविण्यात आले आहे.  


* दगडखदानीचा जाहीर लिलाव

उस्मानाबाद :- उस्मानाबाद तालुक्यातील दगड खदान उस्मानाबाद स.न..426 अ,ब, शिंदेवाडी येथील ग. न.314,  मौ कसबे तडवळे ग. नं. 882 व  मौजे उमरेगव्हाण ग. नं. 50 मधील दगड खदानीचा जाहीर लिलाव साल सन 2012 -2013 करीता कालावधी दिनांक 31/7 /2013 साठी दोन वार मोक्यावर झालेली असुन दिनांक 5 डिसेंबर रोजी तिसरा वार तहसिल कार्यालय उस्मानाबाद येथे घेण्यात येणार आहेत. दगड खदानीच्या अटी व शर्ती तहसिल कार्यालय, उस्मानाबाद येथील नोटीस बोर्डावर डकवण्यात आलेल्या आहेत, असे  कळविण्यात आले आहे.

                                  
 
Top