उस्मानाबाद -: जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2013-14 च्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात येणार आहे. या बैठकीस नियोजन समितीचे सर्व सदस्य, सर्व संबंधित जिल्हास्तरीय अधिकारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती यांनी कळविले आहे.

 
Top