उस्‍मानाबाद -: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्‍त व सरदार वल्‍लभभाई पटेल यांच्‍या जयंती निमित्‍त  पोलीस अधिक्षक कार्यालयात आदरांजली वाहण्‍यात आली. यावेळी गांधी व पटेल यांच्‍या प्रतिमेचे पूजन पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी केले. यावेळी भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्‍यात आली. अपर पोलीस अधिक्षक बी.यु. भांगे, पोलीस उपअधिक्षक अ.सत्‍तार शेख, पोलीस निरीक्षक एस.व्‍ही. कुलकर्णी, गावंडे, जगन्‍नाथ भोसले, अंदुरकर, गायकवाड, जमादार यांच्‍यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
 
Top