तुळजापूर -: नवनिर्मिती महिला मंडळ व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचतगट निर्मित वस्तूंचे उद्घाटन व विक्री स्टॉलचा शुभारंभ रोटरी क्लबच्या अध्यक्षा राधिका पुराणिक यांच्या हस्ते करण्यात आले. पुजारी मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक मोहन गोस्वामी, संस्था अध्यक्षा मीनाताई सोमाजी, अश्विनी शिंदे, मेघना नाईक, सुनंदा पैलवान, संध्या खुरुद, श्रीदेवी वेदपाठक, ज्योती घाडगे, अश्विनी हिरोळीकर, रुपाली घाडगे आदींची उपस्थिती होती. मोहिनी लोंढे यांनी सूत्रसंचालन केले.
