तुळजापुर -:  भारत निर्माण लोक माहिती अभियानाच्या प्रचारार्थ मंगळवार दिनांक 27 रोजी सकाळी निघालेल्या विद्यार्थ्‍यांचा भव्य अशा जनजागरण रॅलीने तुळजापुर नगरी दुमदुमून गेली. शेकडो विद्याथ्र्यांच्या या रॅलीने नागरिक व हजारो भाविकांचे लक्ष वेधून लोक माहिती अभियानाचा संदेश दिला. 
तुळजापूरातील छत्रपती शिवाजी पुतळा चौक येथे तहसीलदार व्ही.एल. कोळी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी तुळजापूरचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, पोलीस निरीक्षक संजय कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक  देशपांडे, पत्र सुचना कार्यालय संचालक प्रशांत पाठराबे, पुणे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, सहायक संचालक टी.बी. नंजुडस्वामी, छायाचित्र अधिकारी सइद अख्तर आदि मान्यवर उपस्थित होते. 
या जनजागरण रॅलीमध्ये तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, लिटल फ्लॉवर मराठी हायस्कूल, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, महर्षी वि.रा.शिंदे हायस्कूल, जिजामाता कन्या प्रशाला या शाळांचे विद्यार्थी तसेच केज येथील तांबवेश्वर कला पथकाचे शाहीर ठोंबरे आणि कलाकार सहभागी झाले होते. शिवाजी पुतळा, भवानी मंदिर, महाद्वार रोड, आर्य चौक, कमानवेस, मंगळवार पेठ, क्रांती चौक या मार्गे आलेल्या या रॅलीचा समारोप नवीन बस स्थानक, लोक माहिती अभियानाच्या ठिकाणी झाला. 
या रॅलीसाठी ए.टी.गव्हाणे, आर.सी.भोसले, आर.आर.बिलकले, पी.एम. सरडे, एम.बी.शेरखाने आणि त्यांच्या सहका-यांनी परिश्रम घेतले. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्‍हणून पोलीस निरीक्षक संजय कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक देशपांडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. महर्षी वि.रा.शिंदे हायस्कूलच्या स्वप्नील भोससले या विद्यार्थांने भारत मातेप्रमाणे वेष परिधान करून लक्ष वेधून घेतले होते. 

 
Top