उस्मानाबाद :- उस्मानाबाद येथील पोलीस परेड मैदान येथे २ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
                  सैन्य भरती मेळाव्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.  दि. २ नोव्हेंबर रोजी लातूर, दि. ३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहूरी, नेवासा आणि श्रीरामपूर हे तालुके, दि. ४ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड आणि श्रीगोंदा हे तालुके, दि. ५ रोजी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, माजलगाव, वडवणी, धारूर, केज आणि परळी तर दि. ६ रोजी बीड, आष्टी, पाटोदा, शिरुर (कासार), आणि गेवराई हे तालुके, दि. ७ रोजी पुणे जिल्हा,  दि. ८ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, परंडा, भूम, कळंब आणि वाशी हे तालुके तर दि. ९ रोजी तुळजापूर, लोहारा आणि उमरगा या तालुक्यातील उमेदवारांसाठी हा सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
        याशिवाय, दि. ९ रोजी  पुणे, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील एनसीसी प्रमाणपत्रधारक, आजी-माजी सैनिक, युद्ध विधवा यांचे पाल्य यांनाही या भरती मेळाव्यासाठी  उपस्थित राहता येणार आहे.
          सोल्जर जीडी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर नर्सिंग असिस्टंटस आणि सोल्जर क्लर्क/ एसकेटी या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. 
             उमेदवारांनी भरती मेळाव्यासाठी येताना स्वत:चे 16 पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, सर्व आवश्यक मुळ कागदपत्रे  तसेच त्यांच्या प्रत्येकी साक्षांकित दोन सत्यप्रतीसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे व त्याच्या साक्षांकित प्रती, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र,जात व सरपंच,नगरसेवक अधिकृत सक्षम अधिका-यांनी दिलेले  प्रमाणपत्र,पोलीस पाटील दाखला अथवा नजीकच्या पोलीस स्टेशनने 6 महिन्यापेक्षा अलीकडच्या काळात जारी केलेले चारित्र्य,निवास,आई वडीलांचे नाव,पोलीस रेकॉर्ड आदिंची माहिती देणारे  प्रमाणपत्र, याशिवाय एन.सी.सी, राज्य,राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात केलेले प्रतिनिधीत्व,संगणक साक्षर, तंत्रनिकेतन,इतर क्षेत्रात प्राविण्य असल्यास प्रमाणपत्र, ज्यांचे वय 18 वर्षाच्या आत आहे अशा उमेदवारांच्या आई वडिलांनी अथवा पालकांनी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र भरती मेळाव्यासाठी येताना आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.
 
Top