लोहारा -: वि‍विध मागण्‍यांसाठी कर्मचा-यांनी दि. 5 नोव्‍हेंबर रोजी लोहारा तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी तहसिलदार शशिकांत गायकवाड याना आपल्‍या विविध मागण्‍यांचे निवेदन दिले. लोहारा तहसिलसमोर चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनी सोमवार रोजी केलेल्‍या आंदोलनामुळे तहसील कार्यालयातील अधिका-यांची व कर्मचा-यांची चांगलीच तारांबळ झाली. शिपायाची कामे स्वत:च करीत असल्‍याचे चित्र पहावयास मिळाले. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात बी.व्ही. स्वामी, ए. एल. माने, एस.ए. पोतदार, आर. एम. शिंदे, बी.पी. पवार आदी सहभागी झाले होते. 

 
Top