तुळजापूर -: येथील लोहिया धर्मशाळेत महिलांसाठी रोटरी क्‍लब तुळजापूरच्‍यावतीने चर्चासत्राचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमात तीनशे महिलांनी उत्‍स्‍फूर्तपणे सहभाग नोंदविला.
आयोजित चर्चासत्रामध्ये उस्मानाबाद येथील डॉ. मिना श्रीराम जिंतूरकर यांनी रजोनवृत्ती समज व गैरसमज या विषयावर मार्गदर्शन केले. तर सोलापूर येथील भूलतज्ञ डॉ. मंजूषा मिलींद शहा यांनी घरगुती अपघात व प्रथमोपचार विषयावर, तसेच याच कार्यक्रमामध्ये स्त्रीभ्रुण हत्या कारणे व उपाय या विषयावर निबंध व कविता स्पर्धा घेण्यात आल्या. निबंध स्पर्धेमध्ये वंदना कुलकर्णी प्रथम, शुभदा पोतदार द्वितीय, तर स्नेहल कांबळे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तर कविता स्पर्धेमध्ये प्राजक्ता कुलकर्णी यांनी प्रथम, सीमा पाटील द्वितीय, पल्लवी शिंदे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. 
सर्व विजेत्यांना यादव हॉस्पीटलच्या वतीने पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी अरविंद चौधरी हे होते.  कार्यक्रमास कुंदन कोंडो, रमेश चव्हाण, अँड. अमोल गुंड, भरत जाधव, डॉ. श्रीराम जिंतूरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहरातील सई महिला बचत गट, माऊली महिला बचत गट, स्वराज महिला बचत गट, यशदा महिला बचत गट, नवनिर्मिती बहुउद्देशीय महिला मंडळ, आर.सी.सी. तुळजापूर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. कार्तिक यादव यांनी केले.

 
Top