उस्मानाबाद -: राज्य्‍ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई यांच्याकडून राज्यातील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयाच्या अध्यक्ष व अन्यायीक सदस्य या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल जाहीर झाला असून तो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, उस्मानाबाद या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर डकविण्यात आला आहे. अन्यायीक सदस्य या पदासाठी पात्र उमेदवारांची मुलाखत राज्य आयोग, मुंबई या कार्यालयामध्ये दि.30 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता तर महाराष्ट्र राज्यातील, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयाच्या अध्यक्ष व अन्यायीक सदस्य या पदासाठी पात्र उमेदवारांची मुलाखत राज्य आयोग, मुंबई या कार्यालयामध्ये दि.1 डिसेंबर व 03 डिसेंबररोजी दुपारी 1 वाजता ठेवण्यात आली आहे. अशी माहिती   जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद  यांनी कळविली आहे.                                       
 
Top