
संत शिरोमणी मन्मथ स्वामी वधु-वर सुचक पुणे संचलित वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातीचा वधु-वर पालक मेळावा रविवार रोजी लिंगायत बोर्डींग बार्शी येथे होत आहे. हा वधु-वर मेळावा रेवण्णसिध्द शिवाचार्य महाराज परांडकर यांच्या अध्यक्षतेखाली व दिलीप सोपल, भाऊसाहेब आधंळकर, बाबुराव नरके, बाबासाहेब कथले, बाबासाहेब मनगिरे, बापुसाहेब देवणे, उत्कर्ष शेटे, भगवान अवधुत, वर्षाताई ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या मेळाव्यास वधु-वर पालकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महालिंग सोलापूर, संजय कोरे, गुंजन अवधूत नंदकिशोर वाले, सागर दसुडे, चंद्रकांत दसुडे, किशोर शिराळ, सागर दसुडे, यांनी केले आहे.