उस्मानाबाद :- जिल्ह्यातील माहे डिसेंबर २०१२ या महिन्यात मुदती संपणा-या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणूकची नोटीस १ नोव्हेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
निवडणूकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. नामनिदेशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दि. ७ ते ११ नोव्हेंबर (सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत). नामनिर्देशनपत्रे छाननी करण्याचा दिनांक व वेळ १२ नोव्हेंबर सकाळी ११ पासून. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतीम दिनांक व वेळ दि.१६ नोव्हेंबर, सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतीमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ दि.१६ रोजी दुपारी ३ वाजेनंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दि. २६ नोव्हेंबर , सकाळी ७.३० पासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दि. २७ नोव्हेंबर. निवडणूक निकाल प्रसिध्द करण्याचा अंतीम दि. २७ नोव्हेंबर .
उस्मानाबाद जिल्ह्यातील पोटनिवडणूका होणा-या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील- सुंभा, उमरे गव्हाण, गोरेवाडी, कावळेवाडी. उमरगा तालुक्यातील-रामपूर,दापका, नागराळ गुंजोटी, कोरेगावाडी, एकुरगा. लोहारा तालुक्यातील- आरणी, कमालपूर, कास्ती बु. मोघा बु. मुर्शदपूर, चिंचोली रेबे, उदत्तपूर, एकोंडी लो., करजगाव, सालेगाव,उंडरगाव. कळंब तालुक्यातील- सातरा. तुळजापूर तालुक्यातील-चव्हाणवाडी,होणाळा,वडगाव लाख. भूम तालुक्यातील-माळेवाडी, बागलवाडी, उमाचीवाडी, वडाचीवाडी, नान्नजवाडी. परंडा तालुक्यातील- घारगांव,खंडेश्वरवाडी,कपीलापूरी. वाशी तालुक्यातील-शेंडी,सोनेगाव, जवळका, सारोळा वा.,पिंपळवाडी.
* ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी गटविकास अधिकारी आचार संहिता प्रमुख
उस्मानाबाद :- माहे डिसेंबर २०१२ या महिन्यात मुदती संपणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असून संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकीसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. पोटनिवडणूकीसाठी आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीसाठी आचारसंहिता प्रमुख म्हणून संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकीच्या आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी तसेच राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानूसार योग्य ती कार्यवाही करावी व संबधित तहसीलदार यांना सदर निवडणूक कामी योग्य ते सहकार्य करावे,असे कळविण्यात आले आहे.