उस्मानाबाद -: उस्मानाबाद आणि तुळजापूर तालुक्यातील नागरीक, लोकप्रतिनिधी आणि अधिका-यांसाठी पाणीबचत व नियोजनाबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शुभमंगल कार्यालय येथे कार्याशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष तथा हिवरे बाजारचे उपसरपंच पोपटराव पवार हे या कार्यशाळेस मार्गदर्शन करणार आहेत. 
दोनही तालुक्यातील पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,सरपंच,तलाठी ,ग्रामसेवक तसेच सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे,असे आवाहन उस्मानाबाद पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी केले आहे.
 
Top