तुळजापूर -: कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर  येथे शासनाच्या आधारभूत किंमत धान्य खरेदी योजने अंतर्गत उस्मानाबाद जिल्हा मार्केटिंग  फेडरेशन मार्फत ज्वारी (मालदांडी), ज्वारी (हायब्रीड) बाजरी, मका इत्‍यादी धान्याची खरेदी केंद्राचे उद्घाटन कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांच्‍या हस्‍ते मंगळवार दि. ६ नोव्‍हेंबर रोजी करण्‍यात आले. यावेळी कृषी बाजार समितीचे सदस्‍य चंद्रकांत लोहार, विठ्ठल वडणे, आबासाहेब मगर, कुलदीप पवार, राठोड, सरडे,  उस्मानाबाद खरेदी विक्री संघाचे नाईक आदीजण उपस्थित होते.
                                                                            * गिरीश लोहारेकर *
 
Top