उस्मानाबाद :- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषदच्यावतीने मुलींच्या जन्माचे स्वागत या विषयावर जनजागृती करण्यासाठी आज पदयात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, आर. आर. हाश्मी, पोलीस उपनिरीक्षक, श्रीमती मुरुमकर, शिक्षण विस्तार अधिकारी लोमटे, डॉ. एन. के. गाडेकर जिल्हा कार्यक्रम व्यव्थापक ए. यु. लाकाळ आदि उपस्थित होते.
ही  रॅली  जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृह-शिवाजी चौक,  डॉ.आंबेडकर चौक, समता कॉलनी, बांधकाम भवन मार्ग येवून पुन्हा जिल्हा परिषद येथे तिचा  समारोप करण्यात आला. या रॅलीत ‘मुलींच्या जन्माचे स्वागत करु या’, ‘मुलगी वाचवा, देश वाचवा’ अशा घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत शरद पवार हायस्कुल, श्रीपतराव भोसले हायस्कुल, छत्रपती शिवाजी हायस्कुल, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक मुलांची शाळा, शम्सुल उलूम उर्दु शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. यासाठी शहर पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा, उस्मानाबाद यांनी सहकार्य केले. 
 
Top