उस्मानाबाद -: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत होणा-या घरकुल योजनेतील कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी समितीचे अध्यक्ष एस.एल.हरिदास यांनी गटविकास अधिकारी व संबंधित यंत्रणेला दिले. येथील त्यांच्या दालनात आयोजित कार्यकारी समितीच्या आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना त्यांनी दिले. यावेळी  प्रकल्प संचालक डॉ.केशव सांगळे यांच्यासह विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. 
              यावेळी बैठकीत मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, मंडळ अधिकारी तालुका कृषी अधिकारी, ग्रामसेवक, बँक कर्मचारी यांच्या कार्यशाळा घेणे, घरकुलाला तांत्रीक मान्यता घेणे, पंचसूत्रीच्या आधारावर पात्र बचतगट लाभार्थीची निवड करणे, कर्मचाऱ्यांना  योजनानिहाय काम ठरवून देणे, लाभार्थींना दिलेल्या रक्क्मेचा धनादेश व लाभार्थीच्या नावासह रक्कमेचा मागील दोन वर्षात कोणत्या लाभार्थींना  किती रक्कम दिली यांचा आढावा घेणे, घरकुलाचे ऑनलाईन अर्ज भरणे, ग्रामपंचायत निहाय रेकार्ड तपासणी करणे,हरयाली प्रकल्प निहाय कार्यान्वय अभिकरण यांचेकडील पाणलोट निहाय कामे आणि  विविध योजनेतील ऑक्टोंबर,2012 ची प्रगती सद्यस्थितीचा तालुकानिहाय आढावा घेऊन संबंधित यंत्रणेला निर्देश देण्यात आले.             

 
Top