तुळजापूर (गिरीश लोहारेकर) -: 26/11 रोजी झालेल्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना तुळजापूर येथील आंबेडकर चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे शाम पवार, भरत जाधव, शामल वडणे, पंकज शहाणे, बापू नायकवाडी, भाजपाचे गुलचंद व्यवहारे, फौजदार संजय कुलकर्णी ,गणेश जळके, परीक्षित पाटील, उमेश कदम आदीजण उपस्थित होते.
* किसान चौकातही श्रद्धांजली
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शहिदांना तुळजापूर येथील किसान चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बाळासाहेब भोसले, उदय भोसले, गिरीश लोहारेकर, प्रसाद पानपुडे, कुमार टोले, दौलत कदम, दादासाहेब मोरे, स्मित कोळपकर, विकास भोसले, विकी भोसले, ओम साळुंके, मोहन भोसले, अमर राजपूत, चंद्रकांत ढोले, काकासाहेब गरड, व इतर दिसत आहेत
या वेळी गिरीश लोहारेकर व कुमार टोले यांनी आपले विचार व्यक्त केले व मार्गदर्शन केले.