माधव गरड

उस्मानाबाद : राज्‍य परिवहन विभागीय कार्यालय उस्‍मानाबाद येथील लिपीक माधव गरड यांना महाराष्‍ट्र कामगार भूषण पुरस्‍कार मुंबई येथील कामगार कल्‍याण भवनच्‍या प्रागंणात प्रदान करण्‍यात आला. क्रिडा व युवक कल्याणमंत्री पद्माकर वळवी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत २९ वा गुणवंत कामगार सोहळा मुंबई येथील कामगार कल्याण भवन येथील मैदानात पार पडला.  यामध्ये माधव गरड, वरिष्ट लिपिक रा. प. उस्मानाबाद यांना २०११-१२ साठीचा कामगार भुषण पुरस्कार वळवी यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करुन प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रु. १५ हजारचा धनादेश असे असुन सदरचा पुरस्कार रा. प. महामंडळ स्थापन झाल्यापासून महामंडळातील कर्मचा-याला पहिल्यांदाच प्राप्त होत आहे. त्याचप्रमणे मराठवाड्यामध्ये सर्व क्षेत्रातील कामगारांमध्ये हा पुरस्कार पहिल्यांदाच मराठवाड्याकडे आला आहे. यावेळी प्रास्ताविक कामगार राज्यमंत्री ना. राजेंद्र गावीत यांनी केले. तर पुरस्काराचे स्वरुप व उद्देश कल्याण आयुक्त मोहन धोत्रे यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे सर्व संचालक उपस्थित होते. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल रा. प. महामंडळाचे अध्यक्ष जिवनराव गोरे, मराठवाडा साहित्य परिषदेचे नितीन तावडे, बालाजी तांबे, रुपेशकुमार जावळे, जि. जी. कुंभार, विभाग नियंत्रक पी. एस. खोबरे, कामगार संघटनेचे सचिव शरद राऊत, इंटकचे राजकुमार दहिहांडे, कास्ट्राईब संघटनेचे संजय कदम, मनसेचे म्हेत्रे, ममोका संघाचे विजय वाघमारे यांनी अभिनंदन केले आहे.

 
Top