तुळजापूर : गटशिक्षण अधिकारी यांच्या मनमानी कारभारास आळा घालण्यासाठी पंचायत समिती सभापती, उपसभापती सह सदस्यांनी बाह्या सरसावल्याने शिक्षण क्षेत्रात जोरदार चर्चा रंगत आहे.
दि. ३१ ऑक्टोंबर रोजी पं.स.तुळजार येथे मासिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली सदर सभेत खालील प्रमाणे चर्चा झाली. गट शिक्षणाधिकारी तुळजापूर यांच्या कामाबाबत सभापती सौ. मनिषा पाटील व उपसभापती प्रकाश चव्हाण या सर्व पंचायत सदस्य यांनी नाराजी व्यक्त करुन त्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करावी व त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करुन त्यांना कार्यमुक्त करावे अशी मागणी गट विकास अधिकारी यांच्याकडे केली असता ते म्हणाले की, भोसले गटशिक्षणाधिकारी ह्या वर्ग २ च्या अधिकारी असल्याने त्यांना त्या स्तरावरुन कार्यमुक्त करता येत नाही. याच बरोबर भ्रष्ट मनमानी व तालुक्याची बदनामी करणा-या गटशिक्षणाधिकारी यांचा चार्ज त्वरीत काढून घेऊन त्यांची बदली करावी अशी गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात येऊन या मागणी बरोबरच खालील मुद्दे गटशिक्षणाधिकारी यांच्या बाबत मांडण्यात आले. कार्यालयात चार दिवसांनी येणे व जे समक्ष भेटतील त्यांचीच कामे करणे, शिक्षकांची रजा जीपीएफ प्रमाणे उशीरा पाठविणे, शिक्षकांना फोन करुन भेटण्यास सांगणे, शाळेच्या संरक्षण भितीचे काम पुर्ण झाले तरी एम.बी.व चेक संबंधितांनी भेट घेतल्याशिवाय न देणे, सहाव्या वेतन आयोगाच्या नोंदी जे शिक्षक समक्ष भेटतील त्यांच्याच घेणे, जि.प.सदस्य सरपंच यांना उलट बोलणे, सर्व शिक्षा अभियान खरेदी केलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असुन त्यामध्ये भ्रष्टाचार केला, ढवळे यांची प्रशासकीय बदली प्रा.शा. सिंदगाव येथे झालेली असताना गटशिक्षण अधिकारी यांनी संबंधित शिक्षक भेटल्यानंतर कोणाचाही आदेश नसताना ढवळे यांची बदली प्रा.शाळा होनाळा येथे करण्याची शिफारस केली व आपला मनमानी कारभार चालु ठेवला, शाळेतील हजेरी स्वताजवळ ठेवून शिक्षकांना कार्यवाहीच्या धमक्या देण्यात आल्या, शाळा तपासणीकरीता संबंधित शाळेस चार चाकी पाठवून देण्याची तंबी देणे, सेवा पुस्तीका पुर्ण करण्याकरीता संबंधित शिक्षकांनी भेटल्याशिवाय सेवा पुस्तिका पुर्ण केली जात नाही, सन २०१० ते २०१३ सर्व शिक्षा अभियान सनियंत्रण समिती, मुल्यमापन समिती यांच्या बैठका न घेता बैठकांच्या बोगस खर्च दाखवून भ्रष्टाचार केला, सर्व शिक्षा अभियानाचे खाते गटशिक्षणाधिकारी व गट समन्वय याचे नावे असताना ते खाते विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचे नावे ठेवून भ्रष्टाचार करणे, पालकमंत्र्यांना निवडलेल्या समितीचीही बैठक घेत नाहीत, सभापती व उपसभापती यांची दिशाभूल करणे वरील सर्व घटनामुळे प्रशासनाची तालुक्यात बदनामी झाली. स्वामी चंद्रकांत महंत्तय्या जि.प.प्रा.शा.केरुर यांची बदलीने सरारी येथे पदस्थापना करण्यात आली. स्वामी हे राहणार इटकळचे आहेत. सराटी गाव हे शहापूर मतदार संघात येते. इटकळ गावही शहापूर मतदार संघातच येते. शासन आदेशान्वये स्वत:च्या मतदार संघात बदली करता येत नाही. वरील सर्व आरोप विचारात घेवून गट शिक्षणाधिकारी यांना कार्यमुक्त करावे अशी मागणी सदस्यांनी गटविकास अधिकारी यांचेकडे केली आहे.