उस्मानाबाद -: माहे जानेवारी ते मार्च,2013 या महिन्यात मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असून त्यानुसार संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकीसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. सदर पोटनिवडणकी संदर्भात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी उमरगा,कळंब व भूम या तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीसाठी आचारसंहिता प्रमुख म्हणून संबधित तालुक्याचे गटविकास अधिकारी , पंचायत समिती यांची नेमणूक केली आहे ,अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी दिली आहे. 
  आचारसंहिता प्रमुखांनी  अधिनस्त ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकीच्या आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेवून राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करावी.असे आदेश त्यांनी दिले आहेत. 
 
Top