उस्मानाबाद -:  क्रीडा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांचेवतीने जिल्हयात जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे दिनांक 26 व 27 डिसेंबर 2012 या कालावधीत सांस्कृतीक हॉल, कामगार कल्याण केंद्र, उस्मानाबाद येथे आयोजन  करण्यात आले   आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त कलाकारांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल देशपांडे यांनी केले आहे.
       युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका-( हिंदी / इंग्रजी), शास्त्रीय गायन ( हिंदुस्थानी / कर्नाटकी ), शास्त्रीय वाद्य –सितार- , बासरी, वीणा, तबला, मृदंग, हॉमोनियम ( लाईट ) गिटार, शास्त्रीय नृत्य ( प्रत्येकी एकप्रमाणे) मणीपुरी, ओ. डी. सी. भरतनाटयम, कथ्थक, कुचीपुडी, वक्तृत्व ( हिंदी / इंग्रजी ) आदि कलाप्रकारांचा समावेश आहे. यात 15 ते 35 वयोगटातील कलाकारांनी आपली बाबनिहाय प्रवेशिका सादर करण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी, जन्म तारखेच्या पुराव्यासह दिनांक 24 डिसेंबर 2012 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे संपर्क साधावा, उशिरा येणाऱ्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत,असे कळविण्यात आले आहे.
 
Top