उस्मानाबाद -: लघु उद्योग घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हयातील दोन उत्कृष्ट लघु उद्योजकास प्रथम व द्वितिय पुरस्कार देऊन गौरविण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेचे स्वरुप पुढील प्रमाणे आहे. प्रथम पुरस्कार रु. 15 हजार, गौरव चिन्ह, शाल व श्रीफळ. द्वितीय पुरस्कार रु.10 हजार गौरव चिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची अंतीम तारीख दि.31 डिसेंबर 2012 ही आहे.
या योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी लघु उद्योगाची दि. 1 जानेवारी 2009 पूर्वी स्थायी लघु उद्योग नोंदणी झालेली असावी, मागील दोन वर्षापासून उत्पादन सुरु असावे, स्थायी लघु उद्योग घटक या योजनेत पात्र ठरु शकतात. ज्या उद्योग घटकांनी यापुर्वी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व जिल्हा पुरस्कार मिळाले असतील ते लघु उद्योजक या पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत. मागासवर्गीय उद्योजकांना 10 टक्के गुणात्मक प्राधान्य देण्यात येणार आहे.
अर्जासोबत खालील कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. अर्जदार/ भागीदार संचालकाचे पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, लघु उद्योग नोंदणी प्रमाणपत्राची छायाकिंत प्रत ( स्थायी नोंदणी ), मागील तीन वर्षाचे गुंतवणुक, रोजगार, उत्पादन व नफा तोटा पत्रक ताळेबंद इत्यादी तसेच सी.ए.प्रमाणित प्रती सादर कराव्यात, बँकेचे/ वित्तीय संस्थेचे मागील तीन वर्षाचे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, अर्जदार/ भागीदारी अनुसुचित जाती/जमाती पैकी असल्यास जातीचे प्रमाणपत्र जोडावे. या योजनेतंर्गत विहीत नमुन्यातील अर्जासाठी जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद व पंचायत समिती येथे उद्योग निरिक्षक यांचेशी संपर्क साधावा.