उस्मानाबाद -: राष्ट्रीय कृषी विमा योजना-रब्बी हंगाम 2012-13 मध्ये गहू व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना बँकांकडे वीमा प्रस्ताव सादर करण्यास आता 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे.
ही मुदतवाढ दि 31 डिसेंबर नंतर पेरणी झालेल्या क्षेत्रासच लागू राहील. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा प्रस्तावावर पीकाची स्थीती चांगली असल्याची नोंद करणे आवश्यक आहे.पीक वीमा प्रस्तावाबरोबरच पेरणीचा दिनांक स्पष्टपणे नमूद केलेले प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.ही मुदतवाढ सर्वसाधारण विमासंरक्षण मर्यादेपर्यंत म्हणजे उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंतच देय राहील व वाढीव विमा संरक्षण देयक असणार नाही.
बागायती गहू पीकासाठी विमासंरक्षीत रक्कम 12 हजार 750 असून विमा हप्ता दर दीड टक्के इतका आहे. जिरायती गव्हासाठी विमा संरक्षीत रक्कम 5 हजार 200 असून विमा हप्ता दर दीड टक्के आहे. हरभरा पीकासाठी विमा संरक्षीत रक्कम 13 हजार 400 रुपये असून विमा हप्ता दर दोन टक्के इतका आहे.