उस्मानाबाद -: ग्रामसखी-हिरकणी महोत्सव येथील लेडिज क्लब मैदानावर सुरु आहे. हे औचित्य साधून बचतगट निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री पाहण्यासाठी महिला सक्रीय होऊन या प्रदर्शनाचा लाभ घेत आहेत. या प्रदर्शनातून महिला बचत गटांना तर लाभ मिळालाच आहे.
या महोत्सवात उस्मानाबाद जिल्ह्यासह विविध भागातून बचतगटांनी सहभाग नोंदवला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेनी दिलेल्या सुविधेमुळे बचतगट व इतर स्टॉलधारकांनी चांगल्या सुख सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. महिला व पुरुष प्रदर्शन भेटी देत असताना म्हणत होते की, असे प्रदर्शनाचे आयोजन नेहमीच झाले तर बचतगटांच्या वस्तूंना चांगली बाजारपेठ मिळेल. महिला आपल्या वस्तूंची विक्री होत असताना त्यांच्या तोडांवरील हस्य लपत नव्हते. ते आनंदाने काम करण्यात व्यग्र दिसत आहेत. या प्रदर्शनाला एका यात्रेचे स्वरुप निर्माण झाले असून यामध्ये लक्षमी आई महिला बचतगट, महालक्ष्मी महिला बचतगट, नाईकनगर यांच्याकडील बंजारा ड्रेस व दागिणे खरेदी करत होते. आदर्श ग्रामपंचायत,काटेवाडी यांनी मोफत बॅनर,पुस्तके व ग्रामगीता व सादरीकरणाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्यासाठी येथे आलो आहोत. जिल्ह्यातील प्रत्येक गावाने गावचा विकास करावा असा यामागील उद्देश असून तो त्यांनी साध्य करावा,अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रदर्शनास आलेले पुरुष हे महानंदा गारमेंन्ट कडून शर्ट विकत घेण्यासाठी गर्दी करत होते. बचत गटातील महिलांशी चर्चा केली असता महिलांची आर्थिक उन्नती होऊन महिला सक्षमीकरणास मदत होत असल्याची भावना महिला व्यक्त करत आहेत.
या प्रदर्शनात बचतगटांच्या वस्तू व विक्री, महात्मा फुले कृषी विद्यापीठातंर्गत विकसीत संकरित कडधान्य जाती, शेती अवजारे, संकरित पशुच्या जाती विषयीची माहिती शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कृषी विद्यापीठातील संबंधित विभाग प्रमुखांचा दुरध्वनी व भ्रमणध्वनींचा नंबर देण्यात येत होता.
हे प्रदर्शन व महोत्सव १२ जानेवारीपर्यंत सुरु राहणार असून या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. केशव सांगळे यांनी केले आहे.