उस्मानाबाद -: राज्य शासनामार्फत सन २०११-१२ या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य, क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, (खेळाडू संघटक, कार्यकर्ते) राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू), जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी आवश्यक त्या माहितीसह वैयक्तिकरित्या विहित नमुन्यात अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी पुरस्काराबाबतची नियमावली व अर्ज राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या www.mahasportal.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या सुधारित नियमावलीतील तरतुदी विचारात घेऊन संबंधित मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनांनी त्यांची शिफारस, आवश्यक ती कागदपत्र व संघटनेच्या ठरावासह अर्ज दि. १५ मार्च २०१३ पर्यंत आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचलनालय, मध्यवर्ती इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ या पत्यावर पाठवावेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा.
 
Top