उस्मानाबाद :- सन २००९-१०, सन २०१०-११ व  सन २०११-१२ या वर्षात गावात शासकीय योजना उत्कृष्टपणे राबवून स्वत:चा ठसा उमटवणा-या ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिका-यांचा राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांचे हस्ते गौरव करण्यात आला. 
        स्वयंवर मंगल कार्यलयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हटटे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, समाजकल्याण सभापती पंडित जोकार, पं.स. सभापती प्रेमलता लोखंडे,  मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) के.डी. बोणे यांच्या  प्रमुख उपस्थितीत या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिका-यांचा सत्कार करण्यात आला आहे.
     सन २००९-१० या वर्षात उस्मानाबाद तालुक्यातील इर्ला येथील ग्रामसेवक लक्ष्मण गरड यांनी गावातील लोकसहभागातून ओढयावर, नाल्यावर वनराई बंधारे बांधून उद्दिष्ट पुर्ण केल्याबद्दल, तुळजापूर तालुक्यातील पिंपळा बु. येथील प्रभाकर नलावडे यांनी तंटामुक्त गाव योजनेत सहभाग घेवन गावास रुपये ३ लाखाचे बक्षिस मिळवून दिल्यावद्दल, उमरगा तालुक्यातील कुन्हाळी येथील महारुद टाकळे यांनी पर्यावरण संतुलीत ग्राम योजना व संपुर्ण स्वच्छता अभियानांर्तत गावात उल्लेखनीय कार्य, लोहारा तालुक्यातील धानुरी येथील अंकुश काळे यांनी अध्याम्याच्या माध्यमातून गावात दारुबंदी व व्यसन मुक्तीचे काम, कळंब तालुक्यातील नायगाव येथील नवनाथ पवार यांनी संपुर्ण स्वच्छता अभियानांतर्गत उल्लेखनीय कार्य, वाशी तालुक्यातील पांगरी व घाटप्रिंप्री येथील अशोक हजारे यांनी तंटामुक्त गाव करण्याठी विशेष प्रयत्न करुन गावास ३ लाख रुपयाचे बक्षिस मिळवून दिल्‍याबद्दल, परंडा तालुक्यातील मलकापूर व रत्नापूर येथील सोमनाथ भिल्लारे यांनी पर्यावरण संतुलीत योजनेस गाव पात्र केल्याबद्दल त्यांचा पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
        सन २०१०-११ या वर्षात उस्मानाबाद तालुक्यातील काजळा येथील ऋषीकेश कुलकर्णी यांनी  महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभाग घेवून गावास बक्षिस मिळवून दिल्‍याबद्दल तसेच गावास निर्मल ग्राम पुरस्कार मिळवून दिलेबद्दल,  तुळजापूर तालुक्यातील वाणेगांव व आपसिंगा येथील प्रशांत भोसले यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हयात प्रथम शाळा, २०१०-११ मध्ये वानेगाव गावास महात्मा फुले जलभुमी अभियानात प्रथम, वाणेगाव निर्मल भारत अभियानांतर्गत १०० टक्के हागणदारीमुक्त, लोकसहभागातून कोल्हापूर पध्दतीचे १५२ गेट बसविले, सानेगुरुजी स्वच्छ शाळाअंतर्गत गावास जिल्हास्तरावर पुरस्कार, सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी वाणेगाव येथील शाळा जिल्हयात तिसरी, अपसिंगा येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव विशेष शांतता पुरस्कार, हरयाली प्रकल्प यशस्वी राबविल्याने गावात हातपंप, विहीरीला दुष्काळातही पाणी असल्यामुळे गाव टॅंकरमुक्त, गावात १० टक्के कुटुंबाकडे शौचालयासह बायोगॅस जोडणी, म. ग्रा. रो. ह. योजनेअंतर्गत लोकसहभागातून १५ शेतरस्ते, अपसिंगा येथे रोपे निर्मिती करुन शासनाच्या शतकोटी वृक्षलागवडीत खारीचा वाटा उचलल्यामुळे या कामास ग्रामसचिव व प्रधान सचिव यांनी भेट देवून गौरविण्यात आले. त्यामुळे भोलसे यांचा विशेष गौरव  करण्यात आला.
       उमरगा तालुक्यातील कोराळ येथील श्रीशैल कलशेट्टी यांनी महात्मा गांधी तंटामुक्त व निर्मल ग्रामपुरस्कार गाव मोहिमेत सहभाग घेवून गावास बक्षिस मिळवून दिले. लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील महादेव जगताप यांनी निर्मल ग्रामपुरस्कार मिळवून दिले. कळंब तालुक्यातील बरमाचीवाडी व अतिरिक्त शेलगाव दि. बरमाची वाडी गाव तंटामुक्त करुन शासनाचे अनुदान ग्रामपंचायतीला प्राप्त करण्याच्या कार्यास सहकार्य केले. वाशी तालुक्यातील  रुई व कन्हेरी या गावास संत गाडेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत कन्हेरी ग्रामपंचायतीला रुपये एक लाखाचे, भुम तालुक्यातील दांडेगाव येथील मच्छिंद्र मस्के यांनी महात्मा गाधी तंटासमुक्त गाव मोहिमेत सहभाग घेवून गावास बक्षिस मिळवून दिले तसेच संपूर्ण स्वच्छता अभियानात उल्लेखनीय कार्य केले आणि परंडा तालुक्यातील शेळगाव व तांदळवाडी येथील ग्रामसेवक लक्ष्मण भिसे यांनी सन २०१०-११ मध्ये आरोग्य ग्राम पुरस्कार व संत गाडगेबाबा तालुका स्तरीय प्रथम पुरस्कार मिळवून दिले.
       सन २०११-१२ या वर्षात उस्मानाबाद तालुक्यातील अंबेहोळ वा, खामगाव येथील ग्रामसेवक वसंत ढाकणे यांनी गाव ६० टक्के हागणदारीमुक्त केले. तुळजापूर तालुक्यातील तिर्थ (खु). येथील  केशव लोखंडे यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभाग घेवून गावास बक्षिस मिळवून दिले. उमरगा तालुक्यातील समुद्राळ व कडदोरा येथल बालाजी निकम यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत व निर्मल ग्राम पुरस्कार मिळवून दिले. लोहारा तालुक्यातील भातांगळी येथील दत्तात्रय पवार यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत पुरस्कार मिळवून दिले. कळंब तालुक्यातील खोदला येथील राजेंद्र मिटकरी यांनी हरियाली योजना व हगणदारी मुक्ती कार्यक्रमास उल्लेखनीय कार्य केले. वाशी तालुक्यातील सोनेगाव येथील मकरंद देशमुख यांनी उर्जाबचत मध्ये सहभाग, भूम तालुक्यातील अंतरवली येथील सुरेखा भोरे यांनी निर्मल ग्राम व पर्यावरण संतुसलित ग्रामसमृध्दी योजनेत बक्षीस व प्रशस्तीपत्र प्राप्त करुन यशस्वी सहभाग आणि परंडा तालुक्यातील शेळगाव व तांदळवाडी येथील ग्रामसेवक लक्ष्मण भिसे यांनी आरोग्य ग्राम पुरस्कार मिळवून दिला. संत गाडगेबाबा तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार मिळवून दिल्याबद्दल प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते पुरस्कार देवून नुकतेच एका समारंभात गौरविण्यात आले आहे.
 
Top