उस्मानाबाद -: जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग व जिल्हा विज्ञान मंडळ, उस्मानाबादच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद जिल्हा विज्ञान प्रदर्शन, शैक्षणिक साहित्य व लोकसंख्या शिक्षण साहित्य प्रदर्शन दि. ३१  जानेवारी  ते  १ फेब्रुवारीपर्यंत विज्ञान भवन हायस्कुल, कळंब येथे आयोजित करण्यात आले असून  त्याचे उदघाटन दि. ३१ जानेवारी सकाळी  ११ वाजता डॉ. प्रशांत पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर राहतील.
    या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून जि.प. चे सभापती पंडीत जोकार, धनंजय सावंत, दगडू धावारे, सविता कोरे, कळंब पंचायत समिती सभापती छाया वाघमोडे, उपसभापती लक्ष्मण अडसूळ, नगराध्यक्ष शिवाजी कापसे, डॉ. अशोक मोहेकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.एम.जाधव माध्यमिक शिक्षणाधिकारी व्ही. के. खांडके, विद्याभवन हायस्कूलच्या मुख्याध्यापक व्ही. एस. पवार आणि गटशिक्षणाधिकारी के.एच. सोनवणे यांनी केले आहे.
 
Top