उस्मानाबाद -: पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, तीर्थ (बु.) ता.तुळजापूर येथे पैदाशीकरीता निरुपयोगी असलेल्या शेळयांचा लिलाव बुधवार, दि.१६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीदारांनी या प्रक्षेत्रावर जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन प्रक्षेत्र व्यवस्थापक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, तीर्थ (बु). ता.तुळजापूर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. भगत - ९८५०६३९६१९, ठवरे - ९४२३९९२०१६ व  ०२४७१-२५९०६६ या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.                                                        

 
Top