उस्मानाबाद -: भारतीय प्रजासत्ताकाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार दि. २६ जानेवारी रोजी येथील पोलीस संचलन मैदानावर सकाळी ९ वाजून १५ मिनीटांनी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी राष्ट्रीय पोशाखात वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेत सकाळी ८-१५ वाजता ध्वजारोहण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे यांच्या हस्ते होणार आहे. या ध्वजारोहण कार्यक्रमांस सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जि.प.चे उप मुख्यकार्यकारी, अधिकारी (सा.) डी. ए. वानखेडे यांनी केले आहे.
सकाळी ७-५० वाजता ध्वजारोहण नगर परिषदेत नगर परिषदेचे अध्यक्ष सरस्वती घोणे यांच्या हस्ते होणार आहे. या ध्वजारोहण कार्यक्रमांस सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नगर. प. चे उपाध्यक्ष अमित दिलीप शिंदे व मुख्याधिकारी अजय चारठाणकर, यांनी केले आहे.