उस्मानाबाद -: कृषि विभागाच्यावतीने कृषी गणना २०१०-११ या संदर्भ वर्षासाठी निविष्ठा सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले असून या सर्वेक्षणासाठी शेतक-यांकडे आलेल्या प्रगणकास अचूक माहिती दयावी, असे आवाहन उपआयुक्त कृषि गणना, कृषि आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे. राज्यातील एकुण गावापैकी ७ टक्के गावात कृषी विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
गावात शेतक-यांकडे शेतीच्या निविष्ठ वापरण्याच्या पध्दतीचा अभ्यास करणे, अत्यल्प, अल्प, निममध्यम, मध्यम व मोठे या आकारमान गटातील शेतक-यांकडे निविष्ठांचा वापर कसा होतो. निविष्ठांचे उत्पादन, आयात व वाटप आदि नियोजन, रासायनिक खताचा वापर, एकात्मिक कीड व्यवस्थापन, अधिक उत्पन्न देणा-या वाणांचे बियाणे, शेणखत/कंपोस्ट खत, जैवीक खते, औषधे, कृषि अवजारे, यंत्रसामुग्री, जनावरे, पशुधन व कृषि पतपुरवठा या कृषी संबंधित निविष्ठांच्या वापराबाबतच्या माहितीचा अभ्यास व नियोजन करण्यासाठी ही माहिती उपयोगात आणली जाणार आहे. या सर्वेक्षणात प्राप्त होणारी माहिती इतर कोणत्याही कारणासाठी उपयोगातात आणली जाणर नसून ती केवळ सांख्यिकीय आकडेवारी मिळण्यासाठी व अभ्यासासाठीच उपयोगात आणली जाणार आहे. प्रत्येक गटातून 4 शेतक-यांची अशा एकुण 20 शेतक-यांकडेच रॅन्डम पध्दतीने ही माहिती घेतली जाणार आहे.