उस्मानाबाद -: चर्मकार समाज व दलित समाजाच्या उध्दारासाठी काम करीत असलेल्या व्यक्तीच्या कामाची दाद घ्यावी व इतर कार्यकर्त्याना बळ व प्रेरणा मिळावी, जेणे करुन सामाजिक उत्थापनासाठी कार्यकर्ते सरसावून पुढे यावेत, यासाठी शासनाने जिल्ह्यातील चर्मकार व दलित समाजात इत्यादी. चे समाज दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक अशा एका व्यक्तिला संत रविदास पुरस्कार देण्याची योजना सुरु केली असून या पुरस्कारासाठी १५ जानेवारी २०१३ पर्यत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यलय,उस्मानाबाद यांनी केले आहे.
व्यक्ती पुरस्कारासाठी पात्रता व निवडीचे निकष पुढीलप्रमाणे राहतील. चर्मकार व दलित समाज इत्यादीचे सामाजिक दूर्बल घटकाचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक असावेत, सामाजिक कल्याण क्षेत्रात कमीत कमी १५ वर्ष कार्य केलेले असावे, पुरुष सामाजिक कार्यकर्त्यांचे वय ५० वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त, स्त्रीयांसाठी ४० वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त, कोणत्याही व्यक्तीस त्याचे आयुष्यात एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारसाठी पात्र समजण्यात येणार नाही, हा पुरस्कार मिळण्यास जात, धर्म, लिंग, क्षेत्र या गोष्टीचा विचार केला जाणार नाही. पुरस्कार मिळण्यास आमदार, खासदार, जिल्हा परिषदेचा सभासद किंवा कोणताही पदाधिकारी पात्र असणार नाही.
पुरस्कार वर्ष सन २०१२-१३ असून त्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, आपण केलेला उत्कृष्ट कार्याचा तपशिल, विना दुराचार प्रमाणपत्र, गैरवर्तनासंबंधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याबाबतचा पोलीस विभागाचे प्रमाणपत्र, इतर पुराव्याचे कागदपत्रे, कात्रणे व तीन पासपोर्ट आकाराचे फोटोसह परिपुर्ण भरलेले प्रस्ताव १५ जानेवारीपर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यलय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद ( दुरध्वनी क्रमांक : ०२४७२-२२२०१४) यांचेकडे तीन प्रतीत सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठीही वरील पत्यावर संपर्क साधावा.