उस्मानाबाद -: भविष्यात वीजेची  निकड लक्षात घेऊन सौरउर्जेच्या माध्यमातून शेतकरी सभासदांनी कारखान्याबरोबरच प्रत्येक नागरिकांनी वीज तयार करावे, असे आवाहन पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांनी केले.
         डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना, अरविंदनगर केशेगाव येथील 10 मेगॅवॅट टर्बाईन उभारणीचा शुभारंभ व 12 लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन आणि शेतकरी मेळाव्यात बोलतांना त्यांनी केले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीमंत विक्रमसिंह घाटगे, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे जयप्रकाश दांडेगावकर, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार बसवराज पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन अरविंद गोरे, शैलेस पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
        राज्यपाल पाटील म्हणाले की, सहकारी साखर कारखान्यांना वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी सौरऊर्जा, वाफेवर चालणारे टर्बाईन प्रकल्पाची उभारणी करावी, पाण्याचे पूर्नवापर केल्यास  वीज व पाणी या संकटावर मात करुन ऊसासारखे पीक येऊ शकेल. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सहकारी कारखान्यानीच नव-नवीन प्रयोग हाती घ्यावेत. शेतकरी व सभासदांनी सौरउर्जेद्वारे वीज निर्मिती केल्यास रक्कमेची बचत होऊन आर्थिक उत्पनात वाढ होते. या प्रकल्प उभारणीसाठी खांबाची आवश्यकता नाही. वीज ही सौरऊर्जाद्वारे मोफत मिळते. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी  शासनातर्फे 30 टक्के अनुदान देण्यात येते. याचा लाभ सर्व शेतकरी सभासदांनी घ्यावा, असे ते त्यांनी सांगितले.
       ऊसासारख्या पीक उत्पादनासाठी पाण्याची गरज असते. त्यासाठी मोठी तळे बांधल्यास त्याचा फायदा शेती उत्पादन वाढीसाठी होईल. ऊसापासून मिळणाऱ्या  साखर, अल्कहोल व वीजेच्या प्रकल्पांना प्राधान्य देण्यात यावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कारखाना हा चांगली प्रगती करत असून  नवीन नवीन उपक्रम हा कारखाना राबवत असल्याबद्ल राज्यपाल पाटील यांनी संचालक मंडळाचे कौतूक केले.
         आमदार बसवराज पाटील म्हणाले की, हा कारखाना चांगल्याप्रकारे चालवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे कार्य करत आहे. काटकसर व योग्य नियोजन केल्यामुळेच प्रगती झाल्याने कारखान्याला नावलौकीक मिळविला आहे. सहकार चळवळ मजबूत करुन गत वैभव प्राप्त करुन देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत मांडले. 
       यावेळी श्रीमंत विक्रमसिंह घाटगे महाराज, श्री.जयप्रकाश दांडेगावकर यांची यावेळी शेतकरी मेळाव्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
    प्रास्ताविक डॉ.बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे चेअरमन अरविंद गोरे यांनी कारखानामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची व प्रगतीचा माहिती दिली. या मेळाव्यास संचालक मंडळ, सभासद शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अँड.शैलेस बारखडे यांनी मानले.
 
Top