उस्मानाबाद -: तुळजापूर विकास प्राधिकरणाअंतर्गत शहरातील सुरु असणा-या विकास कामांचा पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आढावा घेतला.  तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे विकास प्राधिकरणाची सर्वसाधारण समितीची बैठक झाली. त्यात प्राधिकरणाची कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबधितांना सूचना दिल्या.
     जिल्हाधिकारी के.एम. नागरगोजे, प्राधिकरणाचे सदस्य अप्पासाहेब पाटील, नरेंद्र बोरगांवकर, नगरपालिकेच्या अध्यक्षा अर्चना गंगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे यांची  प्रमुख उपस्थिती होती.
     चव्हाण म्हणाले की, शहरातील प्राचीन ऐतिहासिक कुंडाची साफसफाई व डागडुजी करुन घ्या म्हणजे भाविकांना त्याचा उपयोग होईल. श्री तुळजाभवानी मंदिर, शुक्रवारपेठ मधील नागरीकांच्या अडचणी जाणून घेवून संबधित अधिका-यांनी रस्त्याच्या कामांबाबत मार्ग काढावा, असेही ते म्हणाले.
    प्राधिकरणाच्या सर्व कामांची सद्यस्थिती यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी  जाणून घेतली. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.के.नवटाके, कार्यकारी अभियंता देशपांडे, तहसीलदार व्ही.एल. कोळी, मंदिर संस्थानचे तहसीलदार नरहरे, न. प.चे मुख्याधिकारी संतोष जिरगे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. के. भांगे, नगर रचनाकार सुर्यवंशी व संबंधित अधिकारी, सदस्य उपस्थित होते.
 
Top