उस्मानाबाद -: महात्मा गांधी तंटामुक्त जिल्हास्तरीय समिती २०१२-१३ साठी उस्मानाबाद जिल्हा कार्यकारी समिती तसेच सल्लागार व अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आली आहे. या शिवाय तालुकास्तरीय समित्यांचेही गठण करण्यात आले असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तथा जिल्हा कार्यकारी समितीचे सदस्य सचिव  सचिन पाटील यांनी कळविले आहे.
    जिल्हा सल्लागार व अंमलबजावणी समितीत पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यासह  जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्ह्यातील लोकसभा,विधानसभा व विधान परिषद प्रतिनिधी, तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी भूम व उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, कळंब आणि भूम येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विभागीय समाज कल्याण अधिकारी, जिल्हा सरकारी वकील सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, प्रकल्प संचालक, आदिवासी विकास, जिल्हा व्यसनमुक्ती अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच  जिल्हयातील सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिंचा या  समितीत सदस्य म्हणून समावेश् आहे.
जिल्हास्तरीय कार्यकारी समितीत जिल्हाधिकारी हे अध्यक्ष राहणार असून जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, उपविभागीय अधिकारी भूम व उस्मानाबाद,  सर्व उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,  विशेष  समाज कल्याण अधिकारी, जिल्हा सरकारी वकील, सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता, प्रकल्प संचालक, आदिवासी विकास, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा व्यसनमुक्ती अधिकारी व  जिल्हा माहिती अधिकारी  यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय तालुकास्तरावरही समित्या गठीत करण्यात आल्या असून संबंधित तालुक्याचे तहसीलदार हे या समितीच अध्यक्ष असणारा आहेत. या समितीत पंचायत समिती सभापती, तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, गटविकास अधिकारी, सहायक सरकारी वकील, तालुक्यातील पोलीस ठाण्याचे प्रमुख, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापण अधिकारी, स्वयंसेवेी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार यांचे प्रतिनिधी, मोफत कायदेविषयक सल्ला समिती पॅनेलवरील एक वकीलांचा तालुकास्तरीय समितीत समावेश आहे.
 
Top