उस्मानाबाद -: सन २०१२-१३ च्या खरीप हंगामात ज्या गांवाची अंतिम पैसेवारी ५० पैसे वा त्यापेक्षा कमी आलेली आहे अशी जिल्हयातील ४३८ गावे टंचाईग्रस्त म्हणून जिल्हा प्रशासनाने जाहीर केली केली आहेत. या गावातील खाजगी अनुदानीत, विनाअनुदानीत  माध्यमिक शाळेतील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या  विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क माफ करण्यासाठी संबंधित शाळांनी १५ फेब्रुवारीपर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, कार्यालय, उस्मानाबाद यांच्याकडे  प्रस्ताव  सादर करावेत, असे आवाहन  माधयमिक शिक्षणाधिकारी वैजनाथ खांडके यांनी केले आहे.
     संबंधित  माध्यमिक शाळांनी विहीत नमुन्यात विद्यार्थ्यांचे  नाव, इयत्ता, जातीचा प्रवर्ग, परीक्षा शुल्क परिपुर्ती रक्कम आदिंची  माहिती  विहीत मुदतीत पाठवावी. उस्मानाबाद तालुक्यातील ५९ गावे, तुळजापूर तालुक्यातील ११७ गावे, उमरगा तालुक्यातील ८० गावे, लोहारा तालुक्यातील ३७ गावे, कळंब तालुक्यातील ९७ गावे, भूम तालुक्यातील ६ गावे आणि वार्शी तालुक्यातील ४२ गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आले आहेत.
 
Top