उस्मानाबाद -: टंचाई परिस्थितीत पशुधनासाठी खाद्य उपलब्ध होण्याकरीता केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पोर्टेबल फॉडर ब्लॉक मेकिंग  युनीट जिल्हयात उभारण्यात येणार आहे. युनिट उभारणीसाठी केंद्र शासनाचा 75 टक्के  व लाभार्थींचा हिस्सा 25 टक्के राहील. ज्या दुध संघ, दुध उत्पादन सहकारी सोसायटी, फेडरेशन पोर्टेबल फॉडर ब्लॉक मेकिंग युनिटची उत्पादन क्षमता प्रतिदिन 1 मेट्रीक टन आहे, अशा संस्थांनी आपला प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर करावा, असे आवाहन  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. एस. भोसले यांनी केले आहे.      

 
Top