उस्मानाबाद -: औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उस्मानाबादच्यावतीने अल्पसंख्याक लोकसमुह म्हणून घोषित केलेल्या मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, शिख, जैन व पारसी समाजातील उमेदवारांना अल्पमुदतीचे एम.इ.एस योजनेअंतर्गत मार्च २०१३ पासून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य बी.एस.गायकवाड यांनी दिली.
          इच्छुक उमेदवारांनी आयटी सेक्टरमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी विहीत कागदपत्रांची पुर्तता करुन २५ फेब्रुवारीपर्यत अर्ज करावेत. प्रशिक्षणासाठी निवड केलेल्या उमेदवारांना १ मार्चपासून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात उत्तीर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय परिषद, नवी दिल्ली यांनी निर्देशित केलेली परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.   
 
Top