उस्‍मानाबाद -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
          गुरुवार, दि. 28 फेब्रुवारी रोजी  सकाळी 7-05 वाजता सोलापूरहून अणदूरकडे (ता. तुळजापूरकडे) प्रयाण. सकाळी 7-50 वा. अणदूर येथे आगमन व राखीव.  स. 9 -45 वा. शासकीय वाहनाने मुरुम, ता. उमरगाकडे  प्रयाण. 10-45 वाजता मुरुम येथे आगमन व राखीव. 11-30 वाजता मुरुम- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुल कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : कृषी उत्पन्न बाजार समिती,आवार, मुरुम), दु. 2 वा. वाहनाने अणदूरकडे प्रयाण. दु.3 वा.  अणदूर (ता. तुळजापूर) आगमन व राखीव. सायंकाळी 4 वाजता लोहगाव ता. तुळजापूर येथील पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. 6 वा. नंदगाव ता. तुळजापूर  येथे पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. सोईनुसार शासकीय वाहनाने अणदूरकडे प्रयाण, आगमन व  मुक्काम.
         शुक्रवार, दि. 1 मार्च रोजी सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबादकडे प्रयाण. स.10 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. स.10-30 वा. उस्मानाबाद शहरास पुरविण्यात येणाऱ्या उजनी पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी व सोईनुसार शासकीय वाहनाने अणदूरकडे प्रयाण, आगमन व  मुक्काम.
           शनिवार, दि. 2 मार्च रोजी स. 10 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण.  स.10-30 वाजता शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. स. 11 वाजता तुळजापूर तालुका कॉग्रेस कमेटी कार्यालयास भेट व कार्यकर्त्यांशी पक्ष संघटनेसंदर्भात चर्चा व मार्गदर्शन व सोईनुसार अणदूरकडे प्रयाण, आगमन व  मुक्काम.
             रविवार, दि.3 मार्च रोजी अणदूर ता. तुळजापूर येथे राखीव व रात्री 7 वाजता  अणदूरहून सोलापूरकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखीव. रात्री 10-45 वा.सोलापूर येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
 
Top