उस्मानाबाद :- मराठवाड्यात दुष्काळाने मांडलेले थैमान पाहता सरकारने पुरवलेल्या तकलादू उपाय योजना या आम्हाला मान्य नाहीत, सरकारची काम करण्याची भुमिका अत्यंत चुकीची आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काही गावांची पाहणी केली असता जनावरांच्या चार्‍या-पाण्याचा प्रश्‍न अतिशय गंभीर बनला आहे तरी आपले सरकार पोहचू शकत नाही, ही अतिशय दुर्देव आहे असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
        यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, लोकमंगलचे कार्याध्यक्ष  रोहन देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे,  माजी जिल्हाध्यक्ष अँड. मिलींद पाटील, प्रदेशाध्यक्ष सुजितसिंह ठाकुर आदींची उपस्थिती होती.
         पुढे बोलाताना तावडे म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दुष्काळ ङ्गार तिव्र आहे तरी पण रोजगार हमी योजनेची कामे कुठेही चालू असलेली दिसत नाहीत, त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारी जनतेचे स्थलांतर वाढले आहे. ते स्थलांतर थांबविण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी रोजगार हमीची कामे चालू करणे महत्वाची बाब आहे. परंतू प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. जिल्ह्यातील दुष्काळी परस्थितीतवर मात करण्यासाठी जिल्ह्यामध्ये असणार्‍या सामाजिक आणि आर्थिक संस्थांनी दुष्काळ ग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन आम्ही भाजपाच्यावतीने केले आहे. याचबरोबर जिल्ह्यातील तामलवाडी, सुरतगाव, दहिवडी, कसई, बेंबळी, आंबेवाडी, या ठिकाणची पाहणी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली असता त्या ठिकाणी शासनाच्या २५ टक्केसुध्दा सुविधा पोहचलेल्या नाहीत, तरी प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे, असे त्यांनी सांगितले. आमदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपोषणाला माझा पाठींबा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
Top