उस्मानाबाद :- जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे सर्वसाधारण घटक योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीसांठी मोफत घरगुती उपकरणे दुरुस्ती व मोटार रिवायडिंग प्रशिक्षण दि. 26 फेब्रुवारी ते दि. 27 मार्च या कालावधीत उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण सत्र दररोज दुपारी 12 ते सायंकाळी 5 यावेळेत घेण्यात येणार असून यात तज्ञ मार्गदर्शक व अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
तरी इच्छुकांनी प्रवेश अर्ज 25 फेब्रुवारीपर्यंत सादर करावे. प्रशिक्षणासाठी अधिक माहितीसाठी कार्यक्रम समन्वयक अर्चना माळी (मो. 9822671421), महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन एम.सी.ई.डीचे कनिष्ठ प्रकल्प अधिकारी व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र उस्मानाबाद यांनी केले आहे.