उस्मानाबाद -: पालकमंत्री मधूकरराव चव्हाण यांनी  आज उजनी पाणीपुरवठा योजनेच्या कामांबाबतची माहिती घेवून तेरणा जलशुध्दीकरण केंद्रालाही भेट दिली.
    उस्मानाबादसाठी करावयाच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनीहून पाईपलाईनव्दारे पाणी आणले जाणार आहे. या योजनेचे काम सध्या अंतीम टप्प्यात असून पालकमंत्री चव्हाण यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांकडून या कामाबाबतची वस्तुस्थिती  जाणून घेतली. उजनी पाणीपुरवठा योजनेतून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबतचे नियोजन तसेच सध्या त्यासाठी जलशुध्दीकरण केंद्रात काय व्यवस्था करण्यात  आली आहे याची पाहणीही त्यांनी केली. आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, लक्ष्मण सरडे, विश्वास शिंदे यांच्यासह नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय चारठाणकर, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच या योजनेचे काम करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी यावेळी त्यांच्यासमवेत होते.                    
 
Top