उस्मानाबाद :- तालुक्यातील केरोसीन मिळण्यास पात्र शिधापत्रीका धारकांच्या खात्यात केरोसीन सबसीडी थेट जमा करण्यासाठी शिधावस्तू मिळण्यास पात्र असणा-या सर्व शिधापत्रीका धारकांनी त्यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बचत खाते उघडावे, असे आवाहन तहसीलदार अभिजीत पाटील यांनी केले आहे. बचत खाते सुरु केल्याखेरीज त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करणे शक्य होणार नाही. खाते उघडतांना गावातील गावकामगार तलाठी, मंडळ अधिकारी यांचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. शिधापत्रीकाधारकांनी बचतखाते झिरो बॅलन्सवर उघडून घेण्याचे जिल्हयातील सर्व लिड बँक व राष्टी्यकृत बँकेच्या प्रमुखांनी मान्य केले आहे, असे कळविण्यात आले आहे.      
 
Top