उस्मानाबाद :-  तुळजापूर येथे श्री सदगुरु दत्त धार्मिक एवम पारमार्थिक ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण दि. ३० मार्च रोजी करण्यात येणार आहे. याबाबतच्या नियोजनासाठी आज येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यावेळी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, श्री. भैय्युजी महाराज, तुळजापूरच्या नगराध्यक्षा अर्चना गंगणे, जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांची उपस्थिती होती.
         या बैठकीत दि. ३० मार्च रोजी श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा अनावरणासाठीच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तुळजापूरसह सर्व उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे. अतिशय शिस्तबद्ध व  लौकिकास साजेसा असा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी व्हावा, यासाठी श्री छत्रपती संभाजी महाराज पुतळा अनावरण समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
         या बैठकीस आप्पासाहेब पाटील, अँड. शशीकांत निंबाळकर, धीरज पाटील, स्नेहप्रभा पाटील, तुळजापूर नगरपालिकेचे सस्य, महावितरणचे अधीक्षक अभियंता के. बी. राठोड, उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. जी. देशपांडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय म्हेत्रेवार, तुळजापूर नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे, उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिला घारगे-वालावलकर, तहसीलदार व्ही. एल. कोळी, गटविकास अधिकारी तृप्ती ढेरे आदींची उपस्थिती होती.
 
Top