उस्मानाबाद -: जे विद्यार्थी इयत्ता दहावीत शिकत आहेत व ज्यांचा जन्म १ जानेवारी १९९७ ते ३१ डिसेंबर १९९८ च्या दरम्यान आहे. असे महाराष्ट्रातील सर्व पात्र विद्यार्थी सैनिक सेवापुर्व शिक्षण संस्थेचा प्रवेश अर्ज मागवू शकतात. प्रवेश अर्ज स्विकारण्यांची मुदत दि. १५ फेब्रुवारी २०१३ असून प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी रुपये ४०० बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चलन भरुन किंवा राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफट संचालक, सैनिक सेवापुर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद हया नावांने काढावा. संस्थेचे संकेतस्थळ www.spiaurangabad.com वरुन प्रवेशअर्ज डाउनलोड करुन चलन किंवा डी.डी. सोबत संचालक, सैनिकी सेवापुर्व शिक्षण संस्था, एन-१२ सेक्टर, सिडको, औरंगाबाद-४३१००३ या पत्यावर पाठविता येईल, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी दिली आहे.