उस्‍मानाबाद -: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद अंतर्गत मिनी आय. टी. आय. नळदुर्ग ता. तुळजापूर येथे ग्रामिण भागातील दारिद्रयरेषेखालील १६ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींना स्वयंरोजगाराचे तांत्रीक प्रशिक्षण देण्यात येते. तरी दारिद्रय रेषेखालील नांव असलेल्या व शैक्षणीक पात्रता ७ वी ते १०वी पास,  नापास किंवा त्यापुढील अहर्ताप्राप्त असलेल्या इच्छुक लाभार्थ्यांना आपापल्या तालुक्यातील गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय येथे संपर्क साधुन विहीत नमुन्यात प्रवेश अर्ज घेता येतील.
      इच्छुकांनी दारिद्रय रेषेखालील असलेले प्रमाणपत्र व शैक्षणीक प्रमाणपत्राच्या मुळ प्रतीच्या सत्यप्रति अर्जासोबत द्याव्यात. इच्छुक लाभार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयाशी दि. १५ फेब्रुवारीपर्यंत संपर्क साधावा, असे प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा. उस्मानाबाद यांनी कळविले आहे.                                             
    या प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्याच्या असून प्रशिक्षण केंद्रामध्ये रेडीओ, टी.व्ही.दुरुस्ती, वायरमन व ईलेक्ट्रीक मोटार रिवायडींग, वेल्डींग या तीन व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण कालावधीत दारिद्र्यरेषेखालील प्रशिक्षणार्थ्यास दरमहा रुपये 500 विद्यावेतन दिले जाते. तसेच बिगर दारिद्रयरेषेखालील प्रशिक्षणार्थ्यानाही प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी प्रवेश शुल्क रु.50, हत्यारसंच हाताळणी  शुल्क रु. 50 व मासिक प्रशिक्षण शुल्क रु. 50 इतकी फी घेण्यात येते.           
 
Top