उस्मानाबाद -: पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान अंतर्गत ग्रामपंचायत जळकोट यांना पायका क्रीडा केंद्राचे क्रीडगंण तयार करण्यासाठी  एक लाख रुपये अनुदान देण्यात आले होते. या अनुदानातून केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रतिनिधींनी  जळकोट येथील पायका क्रीडा केंद्रास नुकतीच भेट दिली. या क्रीडागंणाचा वापर किती खेळाडू करतात, योजना राबवितांना येणा-या अडचणी याबाबत त्यांनी माहिती घेतली.  या वेळी त्यांच्या समवेत बी. के नाईकवाडी. डि.व्ही. गडपल्लेवार क्रीडा अधिकारी सोनटक्के, अंगोले, कलाल तसेच ग्रामविकास अधिकारी कोटे ही उपस्थित  होते.
 
Top