उस्मानाबाद -: जिल्ह्यातील पशुवैद्यकिय दवाखान्याच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडून ८२ लाख ९० हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा केला होता.
जिल्ह्यातील १७ पशुवैद्यकिय दवाखान्याच्या इमारती दुरुस्तीसाठी स्वेच्छानिधी व केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत मंजूर झालेला आहे. यात इमारत दुरुस्ती, संरक्षक भिंत बांधणे, विद्युतीकरण करणे, खोडा शेड बांधणे आदि विविध कामांसाठी हा निधी उपयोगात आणण्यात येणार असल्याचे जिल्हा पशुसंवधर्न अधिकारी डॉ.आर.आर.चंदेल यांनी कळविले आहे.
तालुकानिहाय पशुवैद्यकिय दवाखान्यांची नावे पुढीलप्रमाणे असून कंसात दर्शविलेला आकडा मंजूर निधीचा आहे. तुळजापूर तालुक्यातील होर्टी (५ लाख), लोहारा-माकणी, धानूरी,सास्तूर, सालेगाव (प्रत्येकी ५ लाख), उमरगा-कदेर,आष्टा ज. नारंगवाडी, बलसूर, (प्रत्येकी ५ लाख), नाईचाकूर (४.७० लाख ). कळंब-निप्पाणी (४.४० लाख), अंदोरा (३.५० लाख), सातेफळ (४ लाख ), कोथळा (४.२५ लाख ). वाशी-पिंपळगाव लिं. (५ लाख ),पिंपळगाव (५.५० लाख )आणि इंदापूर (६.५५ लाख ).
जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती पंडित जोकार तसेच पशुसंवर्धन व दुग्धशाळा विषय समितीच्या सदस्यांनीही या कामांबाबत आग्रही पाठपुरावा केला होता.