उस्मानाबाद -: महाराष्ट्र शासन शालेय उपक्रमातंर्गत विभागीय व्यवसाय  मार्गदर्शन  व निवड संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावी विज्ञान शाखेची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्रीय कसोटीद्वारे मोफत समुपदेशन केले जाणार आहे. यातून विद्यार्थ्यांचे भावी करिअर ठरविण्यासाठी शास्त्रीय आधारावर मानसशास्त्रीय कसोटी चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कल जाणून घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांची आवड, समायोजन, बौद्धीकस्तर, अभियोग्यता आदि तपासून मार्गदर्शन केले जाणार आहे.
    उस्मानाबाद जिल्ह्यात श्रीपतराव भोसले हायस्कूल,उस्मानाबाद आणि श्री महात्मा बसवेश्वर विद्यालय,उमरगा ही नाव नोंदणी स्थळे असणार आहेत. या दोन्हीही ठिकाणी  11 मार्च ते 31 मार्च या कालावधीत नोंदणी करण्यात येणार असून त्यासाठी भोसले हायस्कूल येथे सहशिक्षक टी.पी.शेटे (8806665174) आणि महात्मा बसवेश्वर विद्यालय,उमरगा येथे मुख्याध्यापक के.बी.पवार (9421361543) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी एस.डी.चव्हाण यांनी केले आहे.
    उपरोक्त दोन्हीही ठिकाणी नोंदणी केलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 8 मार्च तर  बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 9 मार्च रोजी श्रीपतराव भोसले हायस्कूल, उस्मानाबाद येथे मानसशास्त्रीय चाचणी होणार आहे. विद्यार्थी  व पालकांनी आपल्या पाल्यांची नावे नोंदणी स्थळावर नोंद करावीत,असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top