तुळजापूर -: जिल्हा परिषदेचे आरोग्य पर्यवेक्षक यांना पाठीशी घालणा-या जिल्हा आरोग्य अधिका-यांवर निलंबनाचे प्रस्ताप शासनाकडे पाठवावी व आरोग्य पर्यवेक्षक यांची नियमबाह्य केलेली प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बसवराज जमादार यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद उस्मानाबाद यांच्याकडे लेखी केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, दि. 30 एप्रिल 2012, दि. 26 जून 2012, दि. 1 ऑक्टोबर 2012 या तारखेस आरोग्य पर्यवेक्षक नलावडे एस.एस. यांची नियमबाह्य केलेली प्रतिनियुक्ती रद्द करणेबाबत वारंवार लेखी सांगूनही याकडे दूर्लक्ष करण्यात आले. त्या उलट जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा प्रशासन त्यांना पाठीशी घालुन त्यांची प्रतिनियुक्ती नियमात कशी बसविता येईल. याकडे लक्ष दिले जात असल्याचे आरोप केले आहे. तरी या्प्रकरणी तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा जमादार यांनी शेवटी केले आहे. निवेदनाची एक प्रत प्रधान सचिव (आरोग्य/ग्रामविकास), उस्मानाबाद पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक यांच्यासह संबंधिताना दिले आहे.