उस्मानाबाद -: येथील जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दीची विक्री करावयाची  असून त्यासाठी इच्छुक खरेदीदारांनी रद्दी खरेदीबाबतची दरपत्रके जिल्हा माहिती कार्यालय, कक्ष क्र. 28, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेत दि. 30 मार्च रोजी पर्यंत सादर करावीत. या मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. दरपत्रकात वृत्तपत्रांच्या तसेच इतर प्रकाशनाच्या रद्दीचा व अन्य किरकोळ रद्दीचा दर स्वतंत्रपणे नमुद करावा. रद्दी विक्रीच्या अटी व शर्ती कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
 
Top